•mr•

झुरळ

मध्यंतरी एक गोष्ट वाचनात आली होती... तीच शेअर करत आहे.

मध्यंतरी एक गोष्ट वाचनात आली होती... तीच शेअर करत आहे.

एका हॉटेल मध्ये तीन मैत्रिणी जेवायला जातात. जेवणाची वात पाहत गप्पा मारण्यात दंग असलेल्या त्या तिघींपैकी एकीच्या हातावर झुरळ चढतो. तिच्या ते लक्षात येते आणि ती घाबरून ओरडू लागते. तिला ओरडताना पाहून बाकीच्या दोघी ओरडू लागतात. हॉटेल मध्ये गोंधळ माजतो. तेवढ्यात शेजारून जाणारा वेटर शांतपणे तिथे येतो, त्या झुरळाची मिशी पकडतो आणि अगदी सहज त्याला बाहेर फेकून देतो. कोणताही आरडाओरडा न करता.

छान आहे न गोष्ट ?

गोष्टीचं तात्पर्य इतकंच की एखादा प्रसंग असा उद्भवतो की आपल्याला काय करू आणि काय नको हे समजेनासं होतं. अशावेळी शांत राहणं आवश्यक असतं, पण ते तितकंच कठीणही असतं कारण हजारो विचार मनामध्ये येत असतात, शंका-कुशंका आपल्याला घेरून टाकतात. प्रसंगी क्रोधही अनावर झालेला असतो.

आणि म्हणूनच अशा प्रसंगात प्रतिक्रिया देण्याऐवजी योग्य प्रतिसाद दिला तर त्याचा आपल्यालाच फायदा होईल हे वेगळे सांगण्याची गरज आहे काय ?

-सौरभ राघवेंद्र.