वेगळा ?
पुण्यात उंच बिल्डींग्स ना काही कमी नाही. आठ, दहा, बारा मजली बिल्डिंग्ज, प्रत्येक मजल्यावर किमान दोन ते सहा फ्लॅट, प्रत्येक फ्लॅट मध्ये एक कुटुंब.. आज रात्री घरी येताना अशीच एक बिल्डींग पहिली.
पुण्यात उंच बिल्डींग्स ना काही कमी नाही. आठ, दहा, बारा मजली बिल्डिंग्ज, प्रत्येक मजल्यावर किमान दोन ते सहा फ्लॅट, प्रत्येक फ्लॅट मध्ये एक कुटुंब.. आज रात्री घरी येताना अशीच एक बिल्डींग पहिली.
गाडी चालवता चालवता विचार करत होतो..
इतके सारे फ्लॅट, त्या प्रत्येकात एक कुटुंब.
प्रत्येक कुटुंबात काही व्यक्ती.
प्रत्येक व्यक्तीची एक गोष्ट.
प्रत्येकाचा काही भूतकाळ.
प्रत्येकाचाच चालू वर्तमान काळ.
आणि जोडीने भविष्याची स्वप्नं...
प्रत्येकाच्याच काही विवंचना.
आणि वहीत सोनेरी क्षणांची मोरपीसं.
प्रत्येकाचीच एक नियती.
प्रत्येकाचं एक आयुष्य.
कोण असतील हे सारे लोक ?
माझ्यासाठी केवळ निनावी चेहरे..
कुठून आले असतील ?
कुठे निघाले असतील ?
रोज सकाळी उठून या गर्दीत हरवून जातात.
आणि रात्री चार भिंतीच्या आत बसून काही वेळ दिवे जाळतात.
मग पुन्हा तीच निनावी गर्दी आणि तेच निनावी चेहरे..
मिसळून जातात..
आणि मग अशाच एका निनावी इमारतीला पाहून काही तरी विचार करणारा मी एक...
मला उगाच वाटतं मी आहे कोणी तरी !! कोणी तरी वेगळा.
पण मी तरी कुठे वेगळा ?
आमच्या बंगल्यासमोरून जाणारे लोक माझ्याबद्दल हाच विचार तर करत असतील..