कोडे
नियती मोठी की माणूस मोठा, या वादात मी कधीच नाही पडलो पण नियतीने केलेला घाव हसत झेलणारा तो मनुष्य पहिला कि प्रत्येक वेळी माझे डोळे पाणावतात.
नियती मोठी की माणूस मोठा, या वादात मी कधीच नाही पडलो पण नियतीने केलेला घाव हसत झेलणारा तो मनुष्य पहिला कि प्रत्येक वेळी माझे डोळे पाणावतात.
त्याचा निरागस मोकळेपणा अचंबित करतो मला . सुरस आणि सुरम्य कथा सांगावी तसे आपल्या आयुष्यातले एक एक वादळ तो माझ्यापुढे उभे करतो.
सोसलेले आघात, गमावलेली मणसे, वाहत्या जखमा आणि चेहऱ्यावर कधीही न मालवणारी हास्याची नाजूक रेष आणि दुर्दम्य उत्साह हे डेडली कॉम्बिनेशन असूच कसे शकते हा माझ्या सारख्या नियतीला शरण जाणाऱ्या पामराचे कोडे आहे.
ते त्या मनुष्याने सोडवले आहे.
-सौरभ राघवेंद्र.
Tags: