केवढी माणसं !
केवढी माणसं !
केवढी माणसं !
कुठून येतात, कुठे जातात,
कुठे राहतात, काय करतात !
केवढी माणसं !
कोणाला सुख हवंय, कोणाला दुःख नकोय.
कोणाला नवस बोलायचाय, कोणाला फेडायचाय.
कोणी गाऱ्हाणं घालतंय, कोणी गाऱ्हाणं मांडतय !
कोणी सोबत आलंय, कोणी सोबती शोधत आलंय.
कुठून येतात, कुठे जातात,
कुठे राहतात, काय करतात !
कोणाकडे वेळच नाहीये, कोणाचा वेळ जातच नाहीए.
कोणी फिरत फिरत आलंय, कोणी फिरायचं म्हणुनच आलंय.
कोणाला आठवणी जमवायच्यात, कोणाला पैसे कमवायचेत
कोणाला काही करायचंय, कोणाला काही तरी करायचंय !
कुठून येतात, कुठे जातात,
कुठे राहतात, काय करतात !
केवढी माणसं !
खरंच..!
कळतच नाही कधी कधी,
एवढी माणसं !
केवढी माणसं !
-सौरभ राघवेंद्र
#चित्रकाव्य
Tags: