•mr•

एमा आणि माझी मराठी !

एमा वॉटसन तिच्या ऍक्टिंग करिअरमधून रिटायर होते आहे अशा आशयाच्या काही पोस्ट मी मगाशी इन्स्टाग्रामवर पाहिल्या. अशा बातम्यांच्या बाबतीत सोशल मिडियाचं 'कानफाट्या' असणं नवं नसल्यानं त्या बातमीवर म…

एमा वॉटसन तिच्या ऍक्टिंग करिअरमधून रिटायर होते आहे अशा आशयाच्या काही पोस्ट मी मगाशी इन्स्टाग्रामवर पाहिल्या. अशा बातम्यांच्या बाबतीत सोशल मिडियाचं 'कानफाट्या' असणं नवं नसल्यानं त्या बातमीवर माझा विशेष विश्वास बसला नव्हता, पण तिची जी इमेज ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम निर्माण झालेली (किंवा केलेली) आहे, त्या इमेजच्या पार्श्वभूमीवर तिचा हा निर्णय मला अगदीच विसंगतही वाटला नाही. त्यामुळे आधी बातमीची खातरजमा करू घेऊ असं म्हणून मी थोडं गुगल केलं तेंव्हा 'हर अकाऊंट मे बी डॉर्मंट, बट हर करिअर इजंट' असं स्टेटमेंट देऊन तिच्या मॅनेजरने या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलेली एक बातमी एका 'ऑथेंटिक' न्यूज पोर्टलवर मला दिसली आणि मला थोडं बरं वाटलं.

खरंच सांगायचं तर, एमाच्या अभिनयाविषयी काही बोलावं एवढा माझा अभ्यास नाही, हॅरी पॉटरच्या पलिकडे "पर्क्स ऑफ बिईंग अ वॉलफ्लावर" व्यतिरिक्त मी तिचा इतर कोणताही चित्रपटही पाहिलेला नाही आणि (फील फ्री टू ट्रोल मी फॉर धिस बट) ती दिसते छान या 'ऍकनॉलेजमेंट' पलिकडे मला पर्सनल लेव्हलवर तिच्याबद्दल फार काही वाटतही नाही; पण तरीही आता इथून पुढे ती आपल्याला कोणत्याच चित्रपटातून किंवा सिरीजमधून दिसणार नाही या कल्पनेनं काही क्षणासाठी माझं बालपण आणि टीनएजस संपल्याची जाणीव पुन्हा एकदा माझ्या मनाला ओझरता स्पर्श करून गेली. नव्वदीच्या दशकात जन्मलेल्या, हॅरी पॉटर पहात आणि वाचत मोठं झालेल्यांना हा स्पर्श ओळखीचा असेल.

एनिवे, द गुड न्यूज इज, एमा इज नॉट क्विटिंग आफ्टरऑल! लेट्स होप की येत्या काळात तिचे चांगले चित्रपट येतील. टिल देन,आज दिवसभरात नजरेखालून गेलेल्या बातम्यांच्या ढिगातल्या नेमक्या याच बातमीविषयी काही तरी लिहावं असं मला आतून वाटलं म्हटल्यावर 'हॅरी पॉटर मॅरेथॉन" आणि एमाचे येऊन गेलेले चित्रपट पाहण्यासाठी थोडा वेळ काढायला हवाच असं वाटायला लागलंय मला! पाहू.

ता.क. 

आपण नुकताच मराठी राजभाषा गौरव दिवस साजरा केला हे मला ठाऊक आहे, पण म्हणून माझ्या 'आंग्लाळलेल्या' मराठीकडे पाहून मझ्याविषयी मनामध्ये कोणतीच अढी ठेऊ नये किंवा माझ्यावर अकारण उडू नये अशी विनंती. इंग्रजीची किंचितही छाप नसलेल्या अस्खलित मराठीमध्येही मी उत्तम लिहू शकतो, जिथे गरज असेल तिथे मी तसं लिहितोही, पण मराठी बोलताना मी हे असंच संमिश्र मराठी बोलतो आणि जसं मी बोलतो तसंच लिहिताना मला खूप कम्फर्टेबल आणि 'ऍट इझ' वाटतं. शिवाय 'माझ्या बोलीभाषेत' लिहिण्याचा हा अट्टाहास- आंग्लाळलेल्या मराठीचा वापर करून 'मी कसा मॉडर्न' वगैरे सिद्ध करण्यासाठी नसून लिहिताना त्या त्या विषयाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन मला माझीच अभिव्यक्ती अनैसर्गिक वाटू नये यासाठीचा असतो. एनिवे!! एमाला यातलं तसंही काहीच कळणार नाहीए आणि तुम्ही बाकी सूज्ञ आहातच, सो चिल आणि गूड नाईट ! 

- सौरभ राघवेंद्र.