सोहळा
दुर्दैव म्हणू की दैव
दुर्दैव म्हणू की दैव
आज मी मृत्यू पाहिला
होत्याचे नव्हते झाले
डोळियां पूर वाहिला
क्षणात धूड कोसळले
प्राण क्षणात निमाले
क्षणात उधळला इथला
हिरवा संसार पाहिला
सांज होऊनी घरटी
पक्षी परतुनी आले
भेसूर मारावा ध्वस्त
तयांचा थवा पाहिला
अंधार पांघरुनी निजली
पिले मुकाट चिरस्वप्नी
स्वप्नात तयांच्या दडला
हसरा पाऊस पाहिला
कुकुटाची बांग अभद्र
माथ्यावर मरीची चिडला
सावलीस तडफडणारा
थकला पांथस्थ पाहिला
राहिले शेष अवयव ते
घेऊन निघाले काही
नररूपी उपजला आज
पांढरा गिद्ध पाहिला
उरले आता केवळ
स्मृतिगंध अजूनही काही
विरतील हळूहळू तेही
मृत्यूचा सोहळा पाहिला
- सौरभ राघवेंद्र.
Tags: