•mr•

कोरोना-कोरोना

या कोरोना-कोरोनाच्या खेळात मास्क आताशा इतका अंगवळणी पडलाय तुम्हाला सांगतो- काल आमच्या बिल्डिंगच्या लिफ्टमधून वर येता येता मास्क काढला आणि लिफ्टमधल्या आरश्यात स्वतःचा चेहरा पाहिला तेंव्हा माझा चेहरा…

या कोरोना-कोरोनाच्या खेळात मास्क आताशा इतका अंगवळणी पडलाय तुम्हाला सांगतो- काल आमच्या बिल्डिंगच्या लिफ्टमधून वर येता येता मास्क काढला आणि लिफ्टमधल्या आरश्यात स्वतःचा चेहरा पाहिला तेंव्हा माझा चेहरा बघून- ट्रस्ट मी, क्षणार्धात, "कोणे हा!? भेंडी मास्क पण लावला नाहीए याने" असा विचार मनात येऊन गेला तोच माझ्या लक्षात आलं की, "अरे! हा तर मास्क काढल्यावरचा मीच!!" फार मजेशीर रिअलायझेशन होतं ते!!शिवाय मला आता अशी शंका येतेय की अजून काही महिने हा मास्क असाच घालावा लागला तर कदाचित माझ्या कानाचा आकार बदलणार आहे बहुतेक आणि नॉट ओन्ली दॅट, माझ्या स्वप्नात सुद्धा आता सगळ्या व्यक्ती मास्क लावूनच येतायत. बिनमास्कचं कोणी आलंच तर एक डोळा उघडून तो मोठा करून मी त्यांना "जा!! आधी मास्क लावा आणि मगच या!" असं सांगतोय हल्ली.

त्यात ते हेल्मेट आणि मास्क हे डेडली कॉम्बिनेशन 'कॅरी', करता करता तर (मास्कच्या आत दडलेल्या) नाकी एक दोन नव्हे तर चांगले नऊ येतात. (हे नाकी नऊ येतात म्हणजे प्रॅक्टिकली काय होतं हे मला आजतागायत कळलं नाही बट दॅट अपार्ट) माझ्या डोक्यावर ऍज इट इज 'इतने सारे बोझ' आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांवर ह्या एका हेल्मेटचा बोझ मला आजिबात सोसवत नाही. कारण नसताना कोणीतरी येऊन डोक्यावर बसलंय असं वाटत राहतं.

अर्थात हेल्मेट वाईट असतं अशातला भाग नाही, पण त्याची सक्ती मात्र हेल्मेट घालूनही चांगलीच डोक्यात जाते. सरकारला आमच्या शेफ्टी-बिफ्टीची काळजी असेल तर भसाभस धूर ओकत जाणाऱ्या हजार गाड्यांवर आधी एखादी कारवाई करवी. कोरोनचा प्रादुर्भाव वाढण्यात हवेच्या प्रदूषणाचा मोठा वाटा आहे. कोरोनाची जगात अजून दुसरी लाट आलीच नव्हती तेंव्हा दिल्लीत कोरोनाची 'तिसरी'(!) लाट आली, तिसरी लाट आली म्हणत होते, त्याचं मोठं करण हवेच्या प्रदूषणातच होतं.

एनिवे, तर मास्क आणि हेल्मेट हे कॉम्बिनेशन हमे बिलकुल रास नही आता. गाडी चालवता चालवता मास्क त्या हेल्मेटमुळं एका कानातून निसटतो आणि निघून येतो. वाटेत टपून बसलेले मामा पाहतील आणि पाचशे रुपयांचा दणका बसेल या भीतीनं मग कडेकडेनं गाडी चालवत एका बाजूला येऊन, थांबून ते सगळं प्रकरण सावरावं लागतं. या गोंधळात माझा कम्यूट टाईम किमान पाच मिनिटाने तरी वाढलाय एव्हाना !!

असो.

आता अखेर नाईलाजास्तव ये वक्त है, गुजर जायेगा अशी गोड समजूत काढत- नाक वितभर मास्क हातभार, नाकापेक्षा मास्क जड, कोरोना चालेल पण तो मास्क आवर, मास्क नाकावर आणि शोध घरभर असे पाचकळ विनोद करत "मास्क अपॉन अ थाऊजंड मोअर" असं म्हणून "चालायचंच!" या युनिव्हर्सिल ब्रीदवाक्याला अनुसरून हाही न्यू नॉर्मल इतरांप्रमाणे मीही व्यवस्थित पचवला आहे. बाकी, तुम्ही मंडळी-लोकही आपापली काळजी घ्या. टिल देन, "दो गज की दूरी, मास्क है जरुरी आणि कोरोना जात नाही तोपर्यंत आहेतच या कुरबुरी!!"

अभी निकलता अपुन. यु पिप्स हॅव अ ग्रेट संडे!

- सौरभ राघवेंद्र