Opinion Beginner

बहरणं

marathi lalit
Sourabh Raghavendra

Sourabh Raghavendra

October 18, 2021 • 5 min read

फुलाचं उमलणं, वृक्षाचं बहरणं या संकल्पनांविषयी मला मोठं आकर्षण वाटतं. त्यात सहजता असते, मोकळेपणा असतो. तुलना नसते, प्रिटेन्शन नसतं. 'मी उमललो' किंवा 'मी बहरलो' हे सांगण्याची आस नसते, व्हॅलीडेशनची अपेक्षा नसते. 'अजून' उमलण्याची- 'लवकर' बहरण्याची हाव नसते. उत्फुल्ल अवस्थेत कोमेजून जाण्याची फिकीर नसते, कोमेजून गेल्यावर वैषम्याची लकेर नसते. कोणी ओरबाडल्याचं दुःख नसतं, सजवल्याचा आनंद नसतो. यातलं काहीच ठरवून आणलेलं, किंवा आपण माणसं करतो तसं- 'कंपॅशन आणि माईंडफुलनेस मेडिटेशन', 'लेटिंग गो थेरपी', 'पॉझिटिव्ह माईंडसेट' वगैरे भंपकपणा करून कृत्रिमपणे कोंबूनही घेतलेलं नसतं. ही अशी अभिव्यक्ती असते जिथे असण्यातलं आणि व्यक्त होण्यातलं अंतर संपून जातं, अस्तित्व आणि अभिव्यक्ती या गोष्टी अभिन्न, अभंग होतात; सौंदर्याचा खरा आविष्कार सिद्ध होतो. म्हणूनच फुलं सुंदर असतात आणि माणसं- सौंदर्याचा भास.

Written by

Sourabh Raghavendra

Strategic thinker exploring the intersection of business, tech, and narrative.